जी.पी.संखे यांच्या निधनाने वंजारी समाजाची प्रचंड हाणी..समाज एका अभ्यासु अाणि लढवय्या नेत्याला मुकला-श्री.अनिल फड


——————————————————
दि.२०अाॅगस्ट,२०१८(मुंबई)

वंजारी समाजाचे लोकप्रिय,अभ्यासु अाणि लढवय्ये नेते श्री.गणपत पांडुरंग संखे यांचे काल दिनांक १९ आॅगस्ट रोजी अपेक्स हाॅस्पीटल,बोरीवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
जी पी संखे नावाने ते महाराष्ट्रभर परीचीत होते.वंजारी समाज हा विमुक्त जाती मध्ये येतो हे सर्व पुराव्यानिशी त्यांनी सिद्ध केले होते.यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि खूप त्रासही त्यांना सहन करावा लागला होता.त्यांनी समाज मंडळाच्या पाठींब्याने मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाविरूध्द याचीका दाखल केली होती, त्या सोबत अन्य अशाच याचिकांचा एकत्रित निर्णय होऊन वंजारी -बंजारा एकच असल्याचा निकाल आल्यानंतर त्यांना सर्व राजकीय टाकत देण्याचे महान कार्य लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबानी केले होते.जी.पी. संखे यांचे हे योगदान समाज कधीही विसरणार नाही.जी.पी. संखे यांच्या न्यायिक लढ्यामुळे आणि मुंडे साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे राजकीय सामाजिक ताक्तीमुळे पुढे शासनाने आपल्या समाजाला विमुक्त भटक्या जमातीचे फायदे दिले नवीन प्रवर्ग निर्माण केले आणि वंजारी समाजासाठी भटक्या जमाती-ड हा प्रवर्ग निर्माण केला.अनेक वर्ष शिक्षणापासुन वंचित असलेला समाज मुळ प्रवाहात अाला.मोफत शिक्षण अाणि शिष्यवृत्तीच्या सवलतीमुळे समाज शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाला.पुढे सहकार क्षेत्रात विविध सहकारी संस्थामधे सुध्दा लोकप्रतिनीत्वासाठी वि.जा.भ.जा. प्रवर्गाला अारक्षण लागु झाले.समाजाच्या झालेल्या या प्रगतीमध्ये जी.पी.संखे यांचे परिश्रम व योगदान हा समाज कदापी विसरणार नाही.
जी.पी.संखे काही वर्षे ठाणे-पालघर वंजारी समाज मंडळाचे अध्यक्ष तथा राज्य मागासवर्गीय अायोगावर सुध्दा होते.त्यांनी समाजाला दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
या अारक्षण प्रवर्गुाच्या लढ्यातील मुंडे साहेबानंतर अाता जी.पी.संखे यांच्या निधनाने आपला समाज एका अभ्यासु नेत्याला मूकलेला असून समाजाची प्रचंड हानी झालेली आहे.
समस्त वंजारी सेवा संघ परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Related posts

Leave a Comment